भारताचा बांग्लादेश विरोधात दणदणीत विजय; रोहितसेनेची सेमी फायनल मध्ये एन्ट्री!
T20WC2022 : टी २० वर्ल्ड कप २०२२ च्या बांगलादेश विरुद्ध सामन्यात भारताने ५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाने आता सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या जबरदस्त खेळीने बांग्लादेशसमोर चार गडी राखून १८५ धावांचा डोंगर उभा केला होता. बांग्लादेश संघ फलंदाजीला उतरला असता काही काळ मोठ्या आत्मविश्वासाने खेळताना दिसत होता.
६८ धावांपर्यंत बांग्लादेश संघाचा एकही बाद नव्हता. दरम्यान, पाऊस पडल्याने बांग्लादेशला फक्त १६ ओव्हर खेळता आल्या. त्यामुळे त्यांना फक्त १५० धावांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. पावसानंतर त्या संघाचा आत्मविश्वास कमी होताना दिसला. १०० धावा पर्यंत बांगलादेशचे चार गडी बाद झाले होते.
बांग्लादेशच्या लिटन दासने चांगली खेळी खेळली. फक्त २७ चेंडूंत त्याने ६० धावा घेतल्या होत्या. मात्र, तो बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंना डाव टिकून ठेवता आला नाही.