विराटच्या खेळीने भारत जिंकला; मात्र, त्यामुळे ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांना बसला कोट्यावधींचा फटका

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी टी20 वर्ल्डकपचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीने भारताच्या ताब्यात आला. हा सामना देशभरातील कोट्यावधी लोक बघत होते. समान जिंकल्यानंतर सर्वत्र दिवाळीत दिवाळी झाल्यासारखं फटाक्यांचा वर्षावही पाहायला मिळाला. मात्र, या संपूर्ण आनंदोत्सवात देशातील व्यापाऱ्यांना मात्र कोट्यावधींचा फटका बसला.
कसंकाय ?
ऐन दिवाळीत कोट्यावधी लोक ऑनलाई किंवा प्रत्यक्ष शॉपिंग करतात. त्यातही रविवार म्हटलं की ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यात सामना दुपारच्या नंतर म्हणजे शॉपिंगच्या प्राईम वेळेत होता. भारत पाकिस्तान सामना सुरु झाल्यापासून लोकांनी इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सामना बघण्यात मग्न झाले. त्यामुळे काही काळ ऑनलाई व्यवहार थांबले होते. त्यात विराट कोहली जेव्हा शेवटच्या ओव्हर खेळत होता, त्यावेळी तर ऑनलाई शॉपिंग अक्षरशः थाबली होती.
त्यासंबंधित एका व्यावसाईकाने युपीआय पेमेंट संबंधित त्या वेळेतील मॅप शेअर केला आहे. ज्यात ऐन दिवाळीत सामन्याच्या दिवशी सकाळी लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी आणि व्यवहार केले आहेत मात्र जसजसा सामना रंगला तसतशी त्यात घट होत गेली. शेवटी कोहलीच्या शेवटच्या ओव्हरच्या वेळी तर हे व्यवहार थांबलेच होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना कोट्यावधींचा फटका यावेळी बसला आहे.