ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चंद्रकांत पाटीलांवर दु:खाचा डोंगर, संघर्षाची शिकवण देणाऱ्या माऊलींचं निधन!

कोल्हापूर : (Chandrakant Dada Patil Mother Death) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झालं आहे. त्या 91 वर्षांच्या होत्या. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांत दादांना त्यांच्या मातोश्रींकडून त्यांनी कायम मिळाली आहे. दादांनीही त्यांची शिकवण अंगीकरून कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

दादांच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असताना मातोश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले. त्यांचे वडील कापड गिरणीत कामाला असताना, पैसे अतिशय कमी मिळत असायाचे. मात्र, त्यांनी कठीण परिस्थितही संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांतदादांना शिक्षण दिलं, संघर्षाची प्रेरणा दिली. दादांच्या आयुष्यात, प्रवासात त्यांच्या आईचा सर्वाधिक वाटा राहिला आहे, अशी भावना चंद्रकांदांनी नेहमी बोलून दाखवाली आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्रींनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहे. दादांच्या मातोश्रीवर रविवार दि. २४ जुलै रोजी रात्री ८.३० वा कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये