१७ महिन्यांत महागाईने गाठला उच्चांक
खाण्या-पिण्याचे पदार्थ महाग झाल्याने मार्चमध्ये किरकोळ महागाईदर सलग तिसर्या महिन्यात ६ टक्क्यांवर गेला आहे. मार्च महिन्यात महागाई ६.९५% नोंदली. ही गेल्या १७ महिन्यांत सर्वाधिक आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये महागाईदर ७.६१% होता. हा गेल्या वर्षी मार्चमध्ये ५.५२% आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये ६.०७% होता.
नवी दिल्ली ः राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) मंगळवारी जारी केलेल्या किरकोळ महागाईच्या ताज्या मासिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली. आकडेवारीनुसार, मार्चमध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे दर सरासरी ७.६८% वाढले. यामुळे गेल्या महिन्यात फेब्रुवारीत हे ५.८५% वाढले होते. मार्च २०२१ मध्ये ४.८७% वाढ झाली.
किरकोळ महागाईचा अंदाज वर्तवला :
रिझर्व्ह बँकेच्या गेल्या आठवड्यात २०२२-२३ च्या पतधोरण आढाव्याच्या पहिल्या बैठकीत किरकोळ महागाई दराचा अंदाज ४.५% वरून वाढवून ५.७% केला. मात्र, बँकेने रब्बी हंगामात विक्रमी कृषी उत्पादन झाल्यास धान्य-डाळींच्या किमतीत नरमाई येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मांस आणि माशाचा सरासरी भाव फेब्रुवारीत ७.५२% राहिला. मात्र, इंधन आणि वीज श्रेणीची महागाई मार्चमध्ये ७.५२% होती. ही गेल्या महिन्यात ८.७३% झाली.
सलग तिसर्या महिन्यात किरकोळ महागाईदर रिझर्व्ह बँकेच्या समाधानकारक पातळीवर आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ महागाईवर लक्ष दिले जाते. सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाईदर २% घट-वाढ करण्याच्या शक्यतेसोबत ४% च्या आसपास ठेवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, नियंत्रणाबाहेरील किमतींमुळे रिझर्व्ह बँकेचे सर्व गणित बिघडले आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मार्चमध्ये तेलाची महागाई वाढून १८.७९% झाली. भाज्यांचे दर सरासरी ११.६४% वाढले.