ताज्या बातम्या

“Bournvita आरोग्यासाठी घातक”; इन्फ्लुएन्सरला ‘तो’ व्हिडीओ बनवणं पडलं महागात

Cadbury Bournvita : काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिमतसिंग्का नामक व्यक्तीने कॅडबरीच्या बॉर्नव्हिटा उत्पादनावर टीका करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅडबरीकडून त्याला कायदेशीर नोटीस देण्यात आली. त्यानंतर इन्फ्लुएन्सरने आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. या बाबतची माहिती स्वत: इन्फ्लुएन्सरने दिली असून व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, हिमतसिंग्का कॅडबरीच्या बॉर्नव्हिटा या उत्पादनावर टीका केली होती. ज्यामुळे त्याता ही नोटीस दिल्याचं सांगण्यात येत आहे.

हिमतसिंग्का यांने रीलच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, सरकारने कंपन्यांना त्यांच्या पॅकेजवर उघडपणे खोटे बोलण्याची परवानगी द्यायला पाहिजे का? पालक त्यांच्या मुलांना लहान वयात साखरेचे व्यसन लावत आहेत आणि मुले आयुष्यभर साखरेसाठी तळमळत राहतात.” शिवाय त्याने ही पोस्ट सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती. डिलीट करण्यात आलेली पोस्ट इंस्टाग्रामवर 12 मिलियनहून अधिक वेळा पाहिली गेली होती. तर ही पोस्ट प्रसिद्ध अभिनेते परेश रावल, माजी क्रिकेटपटू आणि खासदार कीर्ती आझाद यांनीदेखील शेअर केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, Cadbury Bournvita ने 9 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या सोशल मीडियावर उत्पादनाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. ज्यामध्ये कंपनीने सांगितले की, “बॉर्नव्हिटामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, लोह, जस्त, तांबे आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक असतात. जे रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करतात. हे अनेक वर्षांपासून आमच्या फॉर्म्युलेशनचा भाग आहेत. शिवाय आमचे उत्पादन शरीर निरोगी ठेवण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.

दरम्यान, शुक्रवारी हिमतसिंग्का याने Cadbury Bournvita कंपनीची माफी मागितली. त्याने इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये लिहिलं होते. “13 एप्रिल रोजी भारतातील सर्वात मोठ्या लॉ फर्मपैकी एकाकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर मी संबंधित व्हिडिओ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडिओ बनवल्याबद्दल मी कॅडबरीची माफी मागतो. कोणत्याही ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा किंवा कोणत्याही कंपनीची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता. त्यामुळे कंपनीने देखील हे प्रकरण पुढे वाढवू नये अशी विनंती करतो’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये