
मुंबई – INDvsSA Fourth Match | भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज होणार आहे. भारताला ही सीरीज जर गमवायची नसेल तर आजचा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. तिसऱ्या सामन्यात भारताने सांघिक कामगिरी करत विजय मिळवला होता.
पहिल्या सामन्यात भारताने 200 पेक्षा जास्त धावा काढूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आजच्या सामन्यामध्ये सलामीवीर गायकवाडकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मागील सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं होतं. आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.