वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता, मात्र; प्रणिती शिंदेंचं वक्तव्य…

सोलापूर | महिनाभरापूर्वी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने देशात एकच वादंग निर्माण झाला होता. त्याविरोधात भाजपाने आक्रमक होत आंदोलनही पुकारलं होतं. त्यानंतर प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलचं विधान केलं आहे.
काय म्हटलं आहे प्रणिती शिंदे यांनी?
वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. तसंच माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर बराच मोठा वाद झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य वाद निर्माण करू शकतं.