इतरक्रीडाताज्या बातम्या

सीएसकेचा गुजरातकडून सलग तिसऱ्यांदा पराभव, धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण; म्हणाला, “आम्हाला माहित होतं की…”

मुंबई | Csk Vs GT – काल (31 मार्च) आयपीएल 2023च्या (IPL 2023) पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) पाच विकेट्सने विजय मिळवला. आयपीएल हंगामाच्या सलामी सामन्यात गुजरातनं विजयी सुरूवात केली आहे. सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चेन्नईचा पराभव झाल्यानं कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) निराश झाला आहे. धोनीनं त्यांच्या पराभवाचं कारणही सांगितलं आहे.

पहिल्यांदा फलंदाजी केलेल्या चेन्नईच्या संघानं 178 धावा केल्या होत्या. चेन्नईनं दिलेलं 179 धावांचं आव्हान गुजरातनं पाच विकेट राखून पार केलं. त्यामुळे या सामन्याद्वारे चेन्नईला गुजरातविरूद्ध सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये गुजरातनं चेन्नईचा दोन वेळा पराभव केला होता. त्यानंतर कालच्या सामन्यातंही गुजरातनं चेन्नईवर पाच विकेट्सनं विजय मिळवला. या पराभवानंतर धोनी निराश झाला असून त्यानं स्वत: पराभवाचं कारण सांगितलं आहे.

सामन्यानंतर कर्णधार धोनीनं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्हाला माहिती होतं की या मैदानावर दव पडेल. फलंदाजीमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. ऋतुराज गायकवाडनं चांगली फलंदाजी केली. ज्या प्रकारे तो चेंडूला टोलवण्याची निवड करतो, ते पाहणं एक छान अनुभव आहे. माझ्या मते युवा खेळाडूंनी क्रिकेटमध्ये येणं महत्त्वाचं आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये