ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार धनुष्यबाणाशिवाय? ठाकरेंच्या ‘त्या’ विधानमुळं खळबळ!

मुंबई : (Uddhav Thackeray On Shivsainik) बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत २० जुन रोजी बंड पुकारलं. त्यानंतर शिंदे यांनी ५० आमदारांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केलं. शिंदे गट एवढ्यावरचं थांबला नसून, त्यांनी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’ या चिन्हावर देखील दावा केली आहे. बंडखोर गटाकडं  शिवसेनेचं निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेनं 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर या कारवाईला शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टात येत्या 11 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शिंदे गटानं शिवसेनेनं विधीमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी यांच्या केलेल्या नियुक्तीलाही आव्हान दिलं आहे. त्यामुळं शिवसेनेला मोठा शह मिळाला आहे. विधीमंडळातील लढाईसोबत शिवसेनेकडून कायदेशीर लढाई केली जात आहे. मुंबई, दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, वकीलांसोबत शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यामध्ये कायदेशीर डावपेचाची आखणी केली जात आहे. शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐनवेळी आलेले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये