क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

दिल्लीच्या बादशाहांचे, बंगळुरुंच्या नवाबांकडून तीन तेरा…!

बंगळुरू : (IPL 2023 Royal Challengers Banglore vs Delhi Capitals) विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारली होती. दिल्लीला विजयासाठी 175 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. दिल्लीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १५१ धावा केल्या. त्यामुळे आरसीबीने दिल्लीवर या सामन्यात 23 धावांनी विराट विजय मिळवला, तर दिल्लीनं पराभवाचा पंजा केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी २० षटकांत ६ विकेट्स गमावत १७४ धावांपर्यंत मजल मारली. परंतु, या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची मात्र पुरती दमछाक झाली. पॉवर प्ले मध्येच दिल्लीचा अर्धा संघ गारद झाला. पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्शला भोपळाही फोडता आला नाही. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर १९ धावा करून तंबूत परतला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण उडाली अन् आयपीएल २०२३ मध्ये सलग पाचवा पराभव स्विकारावा लागला.

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज यश धुल आणि अभिषेक पोरेल स्वस्तात माघारी परतला. पण अनुभवी मनिष पांडेने आरसीबीच्या गोलंजदाजांचा समाचार घेत ३८ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलने १४ चेंडूत २१ धावा केल्या. विजयकुमारच्या गोलंदाजीवर अक्षर झेलबाद झाला. आरसीबीसाठी विजय कुमारने ३ विकेट्स घेत आरसीबीची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. तसंच मोहम्मद सिराजनेही २ विकेट्स घेत दिल्लीला मोठा धक्का दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये