SRH-LSG यांच्यात ‘करो या मरो’ची लढाई, हैदराबादनं नाणेफेक जिंकली; घेतला ‘हा’ निर्णय
हैदराबाद : (IPL 2023 Sunrisers hyderabad vs lucknow super giants) नाणेफेक जिंकत घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हैदराबाद संघानं घेतला आहे. तर यजमान लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. नियमीत कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाची धुरा कृणाल पांड्याच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी विजय अनिवार्य आहे. त्यामुले हा सामना काँटे की टक्कर असा पाहायला मिळणार आहे. विजयासाठी दोन्ही संघ मोठी मेहनत घेणार आहेत. दरम्यान आजच्या सामन्या लखनौ संघाने संघामध्ये दोन बदल केले आहेत. तर हैदराबादच्या संघात एक बदल केला आहे.
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आघाडीवर असलेला लखनौ संघ सध्या खुप मागे पडल्याचं दिसून येत आहे. आयपीएलमध्ये आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघासाठी जिंकले अनिर्वाय आहे. त्यामुळे आजची टक्कर ही ‘करो या मरो’ची असणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघ एकूण दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड जड आहे. लखनौ संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबाद संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आयपीएल 2023 मधील दहाव्या सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, या सामन्यात लखनौ संघाने हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला.
गुणतालिकेत लखनौ संघाने 11 सामन्यात 5 विजय, 5 हार तर 1 सामना अनिर्णित राहिला असल्याने 1 गुण मिळाला त्यामुळे 11 सामन्यात 11 गुणांची कमाई केली आहे. तर हैदराबाद संघाने 10 सामन्यात 4 विजय आणि 6 पराभवासह 8 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे आजचा विजय कोणाला मिळणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलं आहे.
LSG Playing 11 : लखनौ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकुर, रवी बिश्नोई, युद्धवीर सिंह चरक, आवेश खान
SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद
अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंह, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मारकंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी