क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

गांगुलीनं सांगितलं आयपीएलचं भविष्य! ‘हे’ खेळाडू धमाल करणार; ‘दादां’चा अंदाज खरा ठरणार?

IPL Session 2023 : आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामाला (IPL 2023) 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सर्व दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपलं करिअर घडवलं आहे. या स्पर्धेनं भारताला अनेक विस्फोटक आणि प्रतिभावंत खेळाडू दिले आहेत. आयपीएलमध्ये पुढील पाच वर्षात कोणते खेळाडू चमकू शकतात, असा प्रश्न स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी सौरव गांगुलीने पुढील पाच वर्षात आयपीएलमध्ये कमाल करणाऱ्या पाच खेळाडूंची नावे सांगितली.

पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक, शुभमन गिल या खेळाडूंकडे खूप प्रतिभा असल्याचं गांगुलीने सांगितलं. पुढील काळात हे खेळाडू कशा पद्धतीने स्वत:वर काम करतात, हे पाहावे लागेल, असे गांगुली म्हणाला. गांगुली सूर्यकुमार यादव याचे नाव घ्यायला विसरला होता, त्याला हरभजन सिंहनं आठवण करून दिली, यावर तो म्हणाला की सूर्यकुमार यादव युवा नाही, पण पुढील काही दिवस सूर्यकुमार यादवशिवाय आपले टी20 क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही…

पुढील पाच वर्षात कोणते खेळाडू आयपीएलमध्ये कमाल करु शकतात, या प्रश्नाचं उत्तर देताना गांगुलीने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि उमरान मलिक यांची नावे घेतली. पण गांगुली श्रेयस अय्यर, इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खेळाडू कमाल कामगिरी करत आहेत. हे खेळाडू आपपाल्या संघासाठी महत्वाची कामगिरी कामगिरी करतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये