मानवाला अवकाशात पाठवण्याचे भारताचे स्वप्न होणार पूर्ण; ‘गगनयान मोहिमे’बाबत इस्रोची महत्वाची माहिती

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो बऱ्याच काळापासून अवकाशात भारताकडून अवकाशवीर पाठवण्यासाठी काम करत आहे. अलीकडेच सरकारने यासाठी मिशन २०४० ची तयारी केली आहे. मिशन गगनयान च्या माध्यमातून भारत अवकाशात मानव पाठवण्यासाठी काम करेल. हे काम करण्यासाठी इस्रो वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. आता त्यांच्या हाती यश लागले आहे.
इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ आला आहे. इस्रोने २९ नोव्हेंबरला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये ही टेस्ट केली. या टेस्टमध्ये क्रायोजेनिक इंजिन रि-स्टार्ट करुन पाहण्यात आलं. ही टेस्ट गगनयान मिशनसाठी खूप आवश्यक आहे. मानवी मिशनसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. Launch Vehicle Mark-3 (LVM-3) ला अपर स्टेजमध्ये पावर मिळते. मानवाला अवकाशात पाठवण्याची मोहीम यामुळेच यशस्वी होईल.
२०२५ अखेरिस गगनयानाच्या क्रू विरहीत उड्डाण चाचण्या
इस्रो या ऐतिहासिक मोहिमेकडे सातत्याने प्रगती करत आहे. व्यापक अंतराळवीर प्रशिक्षण, प्रणोदन प्रणाली चाचण्या आणि प्रक्षेपण दरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेल्या क्रू एस्केप सिस्टमचे एकत्रीकरण या सर्व गोष्टी भारतीय अंतराळ संंशोधन संस्थेकडून चालू आहेत. भारताचा गगनयान कार्यक्रम २०२५ च्या अखेरीस क्रू नसलेल्या चाचणी उड्डाणाने सुरू होणार आहे, त्यानंतर अतिरिक्त क्रू नसलेल्या मोहिमा सुरू होतील.