ऐतिहासिक उड्डाण..! इस्रोचे आज एकाच वेळी ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रो आपले पहिले व्यावसायिक उड्डाण करणार आहे. रविवारी सकाळी सातला आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून उपग्रह संचार कंपनी वनवेबसह ३६ उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून भारताचे ‘जीएसएलव्ही एमके ३’ रॉकेट जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा क्षेत्रात प्रवेश करणार आहे.
‘जीएसएलव्ही एमके ३’च्या सज्जतेची तयारी पूर्ण झाली आहे.क्रायो स्टेज इक्विपमेंट बे (ईबी) जोडणी पूर्ण झाली आहे. अंतिम तपासणी शास्त्रज्ञांकडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
इस्रोची व्यावसायिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी वनवेब यांच्यातील कराराचा भाग म्हणून हे प्रक्षेपण होणार आहे.
भारताचे सर्वांत शक्तिशाली रॉकेट प्रक्षेपण ब्रिटनमधील नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेडकडून न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे खरेदी केले होते. भारती ग्रुप हा सपोर्टेड वनवेब ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचा समूह आहे. भारतातील रॉकेटचा वापर व्यावसायिक प्रक्षेपणासाठी प्रथमच होत आहे. तसेच, भारताच्या वर्कहॉर्स पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल व्यतिरिक्त इतर रॉकेटचा व्यावसायिक प्रक्षेपणासाठी वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.