स्टार्ट अप

केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे

कोणत्याही स्टार्टअपला एका उंचीपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी काही काळ वाट पाहावीच लागते. जोशात येऊन नवीन काहीतरी करायचं ठरवलं आणि आठव्याच दिवशी ते सर्वत्र प्रसिद्ध झालं असं होत नाही. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात समृद्धी फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘कॅरामेलाज’ या केकच्या नवीन ब्रँडची सुरुवात केली. पुण्यातील केसनंदमध्ये एका लहान दुकानापासून याची सुरुवात झाली आणि आज पुण्यातल्या कोणत्याही कोपर्‍यात कॅरामेलाज केक उपलब्ध आहे. लोकांची केकची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कॅरामेलाज पुणे, अहमदनगर, ठाणे आणि सातारा या सर्व शहरांत पोहोचले आहे. पुण्यातल्या कानाकोपर्‍यात सध्या पन्नासपेक्षा जास्त शाखा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

केकची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि समाधानकारक सेवा यामुळे कॅरामेलाज सध्या पश्चिम महाराष्ट्रात दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. शुद्ध शाकाहारी, क्वांटिटी आणि क्वालिटी यांचा योग्य मेळ असल्यानं लोक जन्माचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा कोणत्याही कार्यक्रमात कॅरामेलाजचाच केक घेतात. सध्या बाजारात शुद्ध शाकाहारी केक कोठेही मिळत नाहीत. पण कॅरामेलाजमधल्या कोणत्याही शाखेत शुद्ध शाकाहारीच केक मिळतात. ‘लोकांचा कॅरामेलाजवर’ जो विश्वास बसला आहे तो कायम ठेऊन अजून काय नवीन आणि चांगलं देता येईल याचा विचार आम्ही करीत आहोत. ग्राहकांचं समाधान हेच आमचं यश आम्ही समजतो अशी कॅरामेलाजच्या मालकांची भूमिका आहे.

राजेश कोतवाल, इंद्रजित तुपे आणि समृद्धी तुपे यांनी सुरू केलेल्या या स्टार्टअपच्या यशाकडे बघून त्यानंतर अनेक केकसंबंधित स्टार्टअप्स पुण्यात सुरू झाले. त्याच पार्श्वभूमीवर सुरू झालेले अनेक स्टार्टअप्स आताही यशाच्या मार्गावर आहेत. विविध केकचे प्रकार कॅरामेलाजमध्ये उपलब्ध असतात. स्वच्छता, शुद्धता आणि जिभेवर रेंगाळणारी चव ही या केकची ओळख. सध्या कॅरामेलाजच्या फॅक्टरीसह सर्व शाखांमध्ये एकूण १५० पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशा व्यवसायांना प्रवृत्त केलं गेलं पाहिजे. नवीन पिढीने अशा यशस्वी स्टार्टअप्सचा आदर्श घेतला पाहिजे. नोकर्‍यांपेक्षा व्यवसायांवर भर द्यायला पाहिजे. लोक जे लोक करत नाहीत ते शक्य नसतंच असं नाही. करून पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रयोगाला यश मिळत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये