ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“राज्यात शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं…”, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | Ram Shinde On Sharad Pawar – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (CM Eknath Shinde) दिल्यानंतर ठाकरे गट (Thackeray Group) चांगलाच आक्रमक झाला आहे. यादरम्यान, भाजप (BJP) नेते राम शिंदे (Ram Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलंय,” असा गंभीर आरोप राम शिदेंनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राम शिंदे म्हणाले की, “संजय राऊत (Sanjay Raut) हे सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलत असतात. पण शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही त्यांनी बोलावं. या राज्यात शरद पवार यांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. आजतागायत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे यावरही संजय राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.”

“संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ते जे बोलतात त्याला कुठलाही आधार नाही. अमित शाह (Amit Shah) हे राष्ट्रीय नेते आहेत आणि ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं संजय राऊतांचं काम राहिलेलं नाही,” असं म्हणत राम शिदेंनी राऊतांवरही निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये