“कधीच कोणत्या अभिनेत्याला डेट करू नको कारण…”, जान्हवी कपूरने बहिणीला दिला मोलाचा सल्ला
मुंबई | Janhavi Kapoor – श्रीदेवी (Shridevi) आणि बोनी कपूर (Boni Kapoor) यांच्या दोन्ही मुली सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडमधल्या बहिणींच्या लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor). जान्हवी कपूरनं बाॅलिवूडमध्ये यशस्वीरित्या पदार्पण केलं असून आता खूशी कपूरदेखील इंडस्ट्रीत येण्यासाठी सज्ज झाली आहे. याच दरम्यान जान्हवीनं खुशीला मोलाचा सल्ला दिला आहे.
सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘मिली’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत जान्हवी कपूरनं एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी तिनं सिनिअर या नात्यानं तिची लहान बहीण खुशी कपूरला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
जान्हवी कपूरला एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं की, मोठी बहीण या नात्यानं ती खुशी कपूरला काय सल्ला देऊ इच्छिते? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली की, “खुशीला मी असा सल्ला देईन की तिनं कधीही कोणत्याही अभिनेत्याला डेट करू नये. कारण मला वाटतं की माझ्या आणि खुशीसारख्या मुलींनी ते करू नये आणि हेच जास्त चांगलं होईल.”
One Comment