ताज्या बातम्यारणधुमाळी

“फक्त 11 लाखांसाठी त्रास देत आहात…”, संजय राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन यांची प्रतिक्रिया

मुंबई | Jaya Bachchan Support To Sanjay Raut After ED Arrested – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल (1 ऑगस्ट) तीन दिवसांची ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. तसंच संजय राऊतांना ई़डीने अटक केल्यानंतर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये नुकतंच अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना जया बच्चन यांनी भाजपवर टीका केली आहे.

जया बच्चन यांनी नुकतीच संजय राऊत यांना ईडीने अटक केल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. सध्या ट्विटरवर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊतांना केलेली अटक याबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असं तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना जया बच्चन म्हणाल्या, “नक्कीच, आमचा संजय राऊतांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना विनाकारण त्रास दिला जात आहे. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात,” असं त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये