“मोदी, शाह हे राजकारणी, त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं चुकीचं”

मुंबई | Jayant Patil On Chandrakant Patil – भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची पालकमंत्री पदावर निवड झाल्यावर पुण्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये ते म्हणाले होते की, मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या मला चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं ते म्हणाले होते. यासंदर्भात आज (8 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी, शाह हे राजकारणी आहेत. त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं असल्याचं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसंच चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. मराठी माणसं असं कधीही करत नसल्याचंही जयंत पाटील म्हणाले.
दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या झालेल्या सभेनं खरी शिवसेना (Shivsena) कोणाची आहे हे स्पष्ट झालं असल्याचं जयंत पाटील म्हणाले. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं आहे. जर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला चिन्ह दिलं तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जाईल असं जयंत पाटील म्हणाले. तसंच शिंदे गटाकडून सभेसाठी एवढा खर्च करण्यात आला. लोकांना कोंबून मुंबईला आणलं होतं. त्यांना माहिती देखील नव्हती. याची चौकशी व्हायला हवी असंही जयंत पाटील म्हणाले.