“पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला; दिड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवला”!

मुंबई : (Jayant Patil On State Government) राज्यात येवू घातलेला वेदांत ग्रुप आणि फोक्सकाॅन कंपनीच्या संयुक्त भागीदारीनं सुमारे 20 बिलीयन डाॅलर्स म्हणजे (भारतीय रुपयानूसार) एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतक्या भांडवली गुंतवणूकीचा हा प्रकल्प गुजरातला हलावण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, राज्यात गुजरात हिताचे भाजपचे सरकार स्थापन झाल्यामुळे हा प्रकल्प गुजरातच्या धर्तीवर गेल्याने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, वेदांत ग्रुप आणि फोक्सकाॅन कंपनीचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रात होणार होता, परंतु हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होत असल्याचं समोर आलंय. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे. महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
पुढे एका ट्विटमध्ये जयंत पाटील म्हणाले, “या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यांच्या राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. गुजरातच्या निवडणूका तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त दिसते. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?”, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.