जयराज लांडगे यांनी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट

पुणे : गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे व कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांनी आपल्या पदाधिकार्यांसह मनसे प्रमुख राज ठाक यांची मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राजसाहेब यांच्यावरील उपचारानंतर कोल्हापूर व पुण्यातील पदाधिकार्यांनी घेतलेली ही पहिलीच भेट होती. या भेटीत गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाक यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली.
आगामी महानगरपालिकेच्या आणि राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करून राज ठाक यांनी या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जयराज लांडगे यांनी दिली आहे. यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, गजानन जाधव आदी उपस्थित होते.याबाबत माहिती देताना जयराज लांडगे म्हणाले, मनसेप्रमुख राज ठाक यांची गुरुपौर्णिमेनिमित्त सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी जाण्याचा आग्रह पदाधिकारी करीत होते. त्यामुळे दोन्ही योग जुळून आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाक यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली. यावेळी त्यांनी महानगरपालिका आणि राज्यातील नगर परिषदांच्या निवडणूक तयारीविषयी सविस्तर चर्चा केली. मनसे पदाधिकार्यांनी जोमाने कामाला लागावे. कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करा, अशा सूचनाही राज ठाक यांनी दिल्याची माहिती जयराज लांडगे यांनी
दिली आहे.