ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी
“…म्हणून धनुष्यबाण शिंदेंचाच”, निवडणूक आयोगाच्या सुनावणीत जेठमलानींचा युक्तीवाद
मुंबई | Shivsena Party Conflict Hearing In Election Commission (EC) – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. याबाबत आज (17 जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. मागच्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगानं शिंदे गटाची बाजू ऐकून घेतली होती. तसंच आजच्या सुनावणीत ठाकरे गट आपली बाजू मांडणार आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हबाबत आज निर्णय होणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
काय म्हणतात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी?
- धनुष्यबाण चिन्हासाठी आवश्यक बहुमत शिंदे गटाकडे आहे.
- पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास बेकायदेशीर कसा.
- आमदार, खासदारांचं बहुमत शिंदेंकडे आहे.
- मोठ्या संख्येनं लोकप्रतिनिधी बाहेर पडतात यात तथ्य.
- शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रुटी नाहीत, ठाकरे गटाचा आरोप चुकीचा.
- सादिक अली प्रकरणाचा जेठमलानींकडून दाखला
One Comment