ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

महाराष्ट्रात स्त्रीची विटंबना होते हे चुकीचं, गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडिओवर मंगला बनसोडे यांची प्रतिक्रिया

सातारा : (Mangla Bansode On Gautami Patil) काही दिवासांपूर्वी नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एका कार्यक्रमादरम्यानं कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. राज्य महिला आयोगानं देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. गौतमी पाटीलबाबत घडलेल्या प्रकारावर ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात महिला कलावंतांसोबत असे प्रकार घडणं निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं. महिलांची होत असलेली विटंबना पाहून वाईट वाटतं, असंही त्या म्हणाल्या.

मंगला बनसोडे यांच्याशी या प्रकरणी संपर्क केला असता त्यांनी प्रकरणावर भाष्य केलं. गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला, ही घटना वाईट आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे. याच महाराष्ट्रात स्त्रीची विटंबना होते, हे चुकीचं आहे. गौतमी पाटील एक स्त्री आहे. स्त्रीनंतर ती कलावंत आहे, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. कपडे काढतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करणं चुकीचं आहे. तिने याआधी चुका केल्या असल्या तरी तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. पण आता सारखीसारखी ज्या पद्धतीने स्त्री जातीची विटंबना होत आहे, हे पाहून फार वाईट वाटतं,” असं त्या म्हणाल्या.

मी सात वर्षाची असल्यापासून तमाशा फडामध्ये काम करत आहे, असा प्रकार कधीही घडला नाही. आमचे कलाकार कनातीत कपडे चेंज करत असतात पण असा प्रकार कधी घडला नाही. गौतमी पाटील यांच्याकडे सिक्युरिटी असतानाही हा प्रकार घडणे निंदनीय आहे. महिला कलावंतांचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रामध्ये महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

दरम्यान, कलाकार गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी कपडे बदलत असताना मोबाइलवरून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पोलिकांकडून तपास केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये