क्रीडादेश - विदेशमनोरंजन

के एल राहुल जर्मनीत सर्जरीसाठी की गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी; का होतोय ट्रोल राहुल?

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket) दिग्गज खेळाडू के एल राहुल (K L Rahul) सध्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जर्मनीमध्ये आहे. मात्र राहुल जर्मनीमध्ये उपचार घेण्यासाठीच गेला आहे की आपल्या गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी यावर चाहत्यांकडून राहुल ट्रोल होत आहे.

दक्षिण आफ्रीकेसोबतच्या मालिका खेळीसाठी राहुलची कर्णधार पदासाठी निवड झाली होती. मात्र मालिका सुरु होण्यागोदरच राहुलच्या मांडीला दुखापत झाल्याने त्या मालिकेत राहुल सहभागी होऊ शकला नाही. त्याला उपचारासाठी बंगरूळ मध्ये नेण्यात आले होते. मात्र तेथे राहुलवर उपचार होऊ शकत नसल्याने BCCI कडून त्याला जर्मनीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया ही राहुलची गर्लफ्रेंड आहे. आणि राहुल हा जर्मनीला सर्जरीसाठी नाही तर आपल्या गर्लफ्रेंड सोबत फिरण्यासाठी गेला असल्याचं चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावरून चाहते राहुलला चांगलंच ट्रोल करत आहे. मात्र टी वस्तुस्थिती नसून राहुल सर्जारीसाठीच जर्मनीला गेलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये