क्राईमदेश - विदेश

कर्नाटक ‘पीएसआय’ घोटाळ्याला वेगळं वळण- पुणे, भाजप कनेक्शन समोर…

बंगळुरु : कर्नाटकात पीएसआय भरती घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्यात पुण्यातील भारतीय जनता पक्षाचं कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने एका भाजपा महिला पदाधिकाऱ्यास अटक केली आहे. संबंधित महिला नेत्या मागील काही दिवसांपासून पुण्यात लपून बसल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सीआयडीच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. दिव्या हागरगी असं अटक केलेल्या महिला नेत्याचं नाव आहे. त्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या.

मात्र आता, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखलं आहे. दिव्या यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.दरम्यान, आरोपी महिला दिव्या हागरगी यांची कलबुर्गी येथे ‘ज्ञान ज्योती संस्था’ नावाची शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेत ऑक्टोबर २०२१ मध्ये पीएसआय परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेत वीरेश नावाच्या एका उमेदवाराला १२१ गुण मिळाले होते. संबंधित परीक्षेत वीरेशचा सातवा क्रमांक आला होता. पण त्यानं केवळ २१ प्रश्न सोडवले असताना त्याला इतके गुण कसे मिळाले? याबाबत संशय आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये