कार्तिक आर्यनचा धमाकेदार चित्रपट ‘शेहजादा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, लवकरच ट्रेलर रिलीज होणार

मुंबई : (Karthik Aaryan’s new movie ‘Shahzada’ will release soon) दक्षिनात्य अभिनेत्यांचे चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसत आहे. त्यातच आता हिंदी सिनेसृष्टीतील दमदार अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) ‘शेहजादा’ (Shehzada) या चित्रपटाबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. कार्तिकच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर ‘शेहजादा’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली.
दरम्यान, त्याआधी ‘शहजादा’च्या ट्रेलर रिलीजची (teaser Release) तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. एवढेच नाही तर ‘शहजादा’च्या ट्रेलर लॉन्चसाठी निर्मात्यांनी विशेष तयारी केली आहे. तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर (Instagram Handle) ‘शहजादा’च्या ट्रेलर रिलीजच्या तारखेची माहिती दिली आहे. तरणच्या मते, येत्या 12 जानेवारीला ‘शेहजादा’चा दमदार ट्रेलर रिलीज होणार आहे. शहजादा हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘शेहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यनची खास शैली पाहायला मिळणार आहे. कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कार्तिक ‘शेहजादा’मधून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अॅक्शन अवतारात दिसणार आहे. ज्याची झलक तुम्हाला ‘शेहजादा’च्या टीझरमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. ‘शहजादा’मध्ये कार्तिक आर्यनशिवाय बी टाऊन अभिनेत्री क्रिती सेनन आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.