“धनंजय मुंडे आणि रेणूचे…”; करूणा शर्मा यांनी केले खळबळजनक आरोप!

मुंबई – Karuna Sharma Allegations On Dhananjay Munde | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
9 एप्रिल 2022 रोजी रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी एक ट्विट करत धनंजय मुंडे यांचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्याआधीच तिला खंडणीच्या आरोपाखाली अडकवून तुरूंगामध्ये डांबलं असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा (Dhananjay Munde & Renu Sharma) यांचे देखील संबंध होते. या संबंधामध्ये रेणू शर्मा यांच्या आईचा खून कोणी केला. याविषयी पुरावे रेणू शर्मा देणार होती. ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचे सर्व मोबाईल लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पोलिसांनी जप्त केले आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा आरोप करूणा शर्मा यांनी केला आहे.
दरम्यान, करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट (Narco Test) करावी म्हणजे सत्य समोर येईल, अशी मागणीही करूणा शर्मा यांनी केली आहे.