पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान!

कुवेत : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील ‘बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार (Award) प्रदान केला. पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी चर्चेत भारत-कुवेत संबंधांना नवीन गती देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रात परस्पर गुंतवणूक आणि व्यापारावर चर्चा झाली.