“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” शिंदे गटाची वादग्रस्त टीका!

मुंबई : (Kiran Pawaskar On Uddhav Thackeray) अंधेरी-पुर्व पोटनिवडणूकीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर राज्य सरकारचा दबाव असल्याचा आरोप अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी केला होत. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान पावसकर म्हणाले, “प्रत्येकवेळी सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढायच्या, कारणं द्यायची आणि त्यातून पुन्हा एकदा आपलं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या रमेश लटकेंनी शिवसेनेसाठी काम केलं, त्यांच्या पत्नीला तुम्ही शिंदेंकडे गेला होतात का? असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे,”.
“एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतकं घाणेरडं राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात”, अशी वादग्रस्त टीका पावसकर यांनी केली.