देश - विदेश

“संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा…”, संतोष बांगर यांची पुन्हा जीभ घसरली

मुंबई | Santosh Bangar On Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधनसभेत येतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी आज (21 डिसेंबर) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली होती. राऊतांनी केलेल्या या टीकेवर बोलताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. संजय राऊत हे पिसाळलेला कुत्रा आहे, असं वादग्रस्त वक्तव्य बांगर यांनी केलं आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“संजय राऊत हा पिसाळलेला कुत्रा आहे. आम्ही त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्या ठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही, असं संतोष बांगर म्हणाले. तसंच महाविकास आघाडीकडे टीका करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नाही, त्यामुळे त्यांना टीका करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

“कर्नाटकचे मुख्यमंत्री (Basavraj Bommai) म्हणतात की, एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही. महाराष्ट्राची इतकी बेअब्रू गेल्या 70 वर्षांत कधीही बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. जरी सीमाप्रश्न जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मई यांची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये