‘उद्धव बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का?’ प्रश्नावरुन शिवसेनेचा कदमांवर हल्लाबोल!
मुंबई : (Kishori Pedanekar On Ramdas Kadam) शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दोन दिवसांपुर्वी दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांनी केलेलं विधान हे माँ साहेबांचा अपमान करणारे आहे असं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान यावेळी किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी, “रामदास कदम यांनी टीका केली होती की उद्धव ठाकरे हे नक्की बाळासाहेबांचा मुलगा आहेत का” असं म्हणत प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना, “हे इतकं घाणेरडं आहे. ज्या माँच्या हातचं खाल्लं आहे त्या माँच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत,” असं मत किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या, “हे अतिशय वाईट आहे. मरण पावलेल्या दोन्ही व्यक्तींबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. मुलगा आहे म्हणणे गैर नाही. जसं आपण गर्व से कहो हम हिंदू है म्हणतो तसं गर्व से कहो ये हमारा बाप है म्हणणं चुकीचं आहे?” असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला. शिंदे गटातील नेत्यांना लक्ष्य करताना किशोरी पेडणेकर यांना, “तुमच्या बापाच्या नावावर कधी लढले नाही. लढले तर शिवसेना पक्षप्रमुखांच्याच नावावर लढले.