किशोरी पेडणेकरांना धक्का! अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर..

मुंबई : (Kishori Pednekar Bail Rejected) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे. त्यानंतर तपास यंत्रणाद्वारे विरोधकांना जेरीस आणण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचे विरोधक बोलत आहेत. ठाकरे गटातील मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं धक्का दिला आहे.
दरम्यान, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळं पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी झालेल्या बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्यांच्यांसह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे.
दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी या पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळे पुढील काळात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.