ताज्या बातम्यारणधुमाळी

“दीपक केसरकर उडते पक्षी…”, किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

मुंबई | Kishori Pednekar On Deepak Kesarkar – आज (बुधवार) गुरूपौर्णिमेनिमित्त शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत. तसंच यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील अभिवादन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. दरम्यान यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार व्यक्त केला आहे. तसंच त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही टीकास्त्र सोडंल.

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणार,” असा विश्वास व्यक्त केला आहे. तसंच दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी संजय राऊतांची भाषा बोलायची की उद्धव ठाकरे यांची याचा निर्णय लवकर घ्यावा असं म्हटलं आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी केसरकरांवर हल्लाबोल केला आहे. “दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारू नका.”

दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेत आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात  आलं आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आरोप केला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये