Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई | अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी आज मोठ्या आनंदाचा दिवस म्हणावा लागेल. कारण पठाण (Pathan) सोबत सलमानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी का जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 24 जानेवारी रोजी सलमानने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत टीझरबद्दलची माहिती दिली होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आज संपली आहे.
या चित्रपटाच्या टीझरमध्ये सलमानचा नेहमीप्रमाणे ॲक्शन अवतार पहायला मिळतोय. तसेच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत काही रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. त्याप्रमाणे ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शेहनाज गिल (Shehnaaz Gill) सुद्धा अनोख्या अवतारात दिसून येत आहे. शेहनाजला साऊथ इंडियन लूकमध्ये पाहून चाहते खुश झाले आहेत. त्याचप्रमाणे शहनाजसोबतच या टीझरमध्ये जस्सी गिल (Jassie Gill), राघव जुयाल (Raghav Juyal) आणि पलक तिवारी (Palak Tiwari) हे कलाकारसुद्धा पहायला मिळत आहेत.