क्रीडादेश - विदेश

कोलकाता पहिल्या पराभवाचा बदला घेणार? की राजस्थान प्लेऑफचे स्थान पक्के करणार…

 मुंबई : आयपीएल २०२२ च्या १५ व्या आयपीएल हंगामातील आज ४७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. याआधीच्या सामन्यात राजस्थानने कोलकात्यावर ७ धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलमध्ये दोन्ही संघ एकूण २५ वेळा आमने सामने आले आहे. कोलकाता आणि राजस्थान यांच्यात नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळते.

दरम्यान, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २५ सामने खेळले गेले आहे, त्यापैकी १३ केकेआरने जिंकले आहेत आणि १२ रॉयल्सने जिंकले आहे. अशा स्थितीत केकेआर पुढे आहे पण सध्याच्या कामगिरीनुसार सद्या तर राजस्थान वर आहे. या वर्षीच्या पाॅईंट टेबलमध्ये ९ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह राजस्थान सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरला गेल्या पाच सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत आज जर संघ हरला तर त्याच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात येऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये