कोयता गँगची दहशत सुरूच! ज्येष्ठ नागरिकावर केले कोयत्याने वार

पुणे | Pune Koyta Gang – पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची (Koyta Gang) दहशत सुरूच आहे. आत्तापर्यंत कोयता गँगनं हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसंच आता देखील कोयता गँगनं (Koyta Gang) हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. एका ज्येष्ठ नागरिकावर एका टोळीनं कोयत्यानं वार केले आहेत. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे मैदानवर झोपलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काही तरुणांनी कोयत्यानं हल्ला केला. या तरूणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्यानं खुनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी काही तरूणांसोबत फिर्यादी सतीश काळे यांची किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री त्यांच्यावर हल्ला केला. तसंच शिवाजीनगर पोलीस स्थानकात दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर भागात असलेल्या एका मैदानावर फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह रात्री झोपले होते. त्यावेळी या कोयता गँगनं (Koyta Gang) त्यांच्यावर हल्ला केला. तसंच आता पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरु आहे.