ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांचा जीव 8 ऑगस्ट पर्यंत टांगणीला?

मुंबई : (Shiv Sena and Shinde Group Matter Supreme Court) शिवसेनेकडून शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिशींना आव्हान देणाऱ्या एकूण पाच याचिकांवर आज न्यायालयात एकत्रित सुनावणी पार पडली.

दरम्यान, सकाळी 10ः50 मिनिटांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली. या पहिल्या क्रमांकावर असेलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पडली.

याप्रकरणाची पुढील सुणावणी सोमवार दि. 08 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे. तुर्तास निवडणुक आयोगाने जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. 08 ऑगस्ट याच दिवशी ठरणार आहे हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देणार का? हे समजणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांचा जीव 08 ऑगस्ट पर्यंत टांगणीला लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये