Top 5पुणेमनोरंजनलेखसंपादकीय

गाण्यापलिकडच्या लता मंगेशकर…

लता मंगेशकर यांच्या अज्ञात पैलूंविषयी फार कमी चर्चा होताना दिसते. लता मंगेशकर यांना आपल्या अन्य छंदांविषयी कमालीची आत्मीयता होती. या तीन छंदांमध्ये क्रिकेट, फोटोग्राफी आणि कुकरी यांचा समावेश होतो.

वेगळी वाट | श्रीनिवास वारुंजीकर |

लंडनमधील लॉर्ड््स मैदानावर २४ जून १९८३ रोजी भारतीय क्रिकेट संघ सर्वप्रथम क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचला होता. त्यादिवशी सर्व भारतीय संघातील खेळाडू हे तणावाखाली होते. कारण २५ जून रोजी त्यांचा मुकाबला होणार होता तो बलाढ्य वेस्ट इंडिजशी.

तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकणारच, असे वेस्ट इंडिजने गृहीत धरले होते. म्हणून २४ जूनच्या संध्याकाळी संपूर्ण भारतीय संघाला लता मंगेशकर यांनी त्यांच्या घरी भोजनासाठी निमंत्रण दिले होते. लॉर्ड््स क्रिकेट मैदानाच्यासमोरच अपार्टमेंटमध्ये लता मंगेशकर यांचा फ्लॅट होता. २४ जूनच्या संध्याकाळी सर्व खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी लता मंगेशकर यांनी कपिलदेवच्या संपूर्ण टीमला भोजनाचे निमंत्रण दिले आणि सर्वांना मनसोक्तपणे नैसर्गिक खेळ करण्याची विनंती केली.

२५ जून रोजी भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटविश्वातला आजवरचा सर्वात मोठा चमत्कार घडवत बलाढ्य वेस्ट इंडिजला ४३ धावांनी पराभूत केले आणि विश्वचषक जिंकला. हा विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच रात्री पुन्हा एकदा लता मंगेशकर यांनी संपूर्ण भारतीय संघासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना आपल्या घरी भोजनास निमंत्रण दिले आणि सर्वांनी तो दिवस अतिशय आनंदाने साजरा केला. या स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी नवी दिल्लीमध्ये लता मंगेशकर यांनी एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आणि मिळालेला निधी त्यांनी भारतीय संघाच्या इंग्लंड भेटीसाठी खर्च केला होता. भारतीय संघ विश्वचषक जिंकून आल्यानंतरही एका कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसेही देण्यात आली होती.

लता मंगेशकर आणि सुनील गावसकर यांचेही नाते अतिशय जवळचे असे होते. त्यानंतर शतकांचा महाशतकवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला लता मंगेशकर यांना भेटण्याचा योग आला, त्या वेळी अत्यंत नैसर्गिकपणे आणि हृदयाच्या तळापासून सचिन तेंडुलकरने लता मंगेशकर यांना ‘आई’ अशी हाक मारली आणि एक अनोखे नाते यानिमित्ताने जन्माला आले. सचिन तेंडुलकरच्या त्या हाकेमुळे गहिवरलेल्या लता मंगेशकर यांनी आयुष्यभर सचिनला आपला मानसपुत्र मानले.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची उभारणी पुण्यामध्ये करण्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान एक एकदिवसीय सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भरवण्यात आला आणि या सामन्याचे संपूर्ण उत्पन्न दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी देण्यात आले. क्रिकेटच्या बरोबरीने लता मंगेशकर यांचे प्रेम होते ते फोटोग्राफी, अर्थात छायाचित्रणावर. निकॉन किंवा कॅनन कंपनीचे अद्ययावत कॅमेरे त्या स्वतः वापरत असत आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेल्या तरी त्यांचा कॅमेरा सदैव त्यांच्याबरोबर असे. विमानतळ, विमानातून दिसणारा सूर्योदय किंवा सूर्यास्त असेल किंवा ऑस्ट्रेलिया, अमेरिकेमधील वेगवेगळे बीचेस असतील, अशा सर्व ठिकाणी लता मंगेशकर यांनी अप्रतिम असे छायाचित्रण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये