ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“बायडन-पुतीन-चार्ल्स या तिघांमध्ये चर्चा, उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते”, राऊतांचं विधान

मुंबई : (Sanjay Raut On Eknath Shinde) काही दिवसांपुर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला होता. त्याला उपहासात्मकपणे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे कोण आहेत? अशी विचारणा केली, या माणसाची कमाल आहे. इतकी संकंट आली तरी ते हार मानत नाहीत” टीका त्यांनी नाव न घेत शिंदे गटावर केली आहे.

एवढ्यावरच थांबतील ते राऊत कसले. पुढे ते म्हणाले “उद्या युद्धाची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. जो बायडन पुतीन यांना उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते. ते म्हणत होते मोदींना विचारा, त्यांनी अजून आपली भेट का करुन दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते,” असं संजय राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले “देशात युद्धाची स्थिती असून सगळं जग निराश आहे. अशावेळी उद्धव ठाकरे लढत आहेत. ही सुद्धा एक सेना, फौजच आहे ना. याचमुळे देशांचे प्रमुख लोक उद्धव ठाकरे कोण आहेत अशी विचारणा करत आहेत”. यावेळी एकनाथ शिंदेंना टोला लगावताना ते म्हणाले की, “क्लिंटनचा जमाना केव्हाच संपला हे कळलं पाहिजे”, अस संजय राऊत म्हणाले. त्यामुळे हा वाद आता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये