पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स
तिरंगा ध्वज सुपूर्त करून जवानांच्या शौर्याला सॅल्यूट

खडकी : आज ‘त्यांचे’ आयुष्य ‘व्हीलचेअर’वर आहे. का? तर देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावताना त्यांना अपंगत्व आलेय. असे असूनही दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर निर्धाराच्या बळावर ते देशासाठी पुन्हा लढण्याचे स्वप्न बाळगून आहेत.
अशा अतुलनीय जवानांसमवेत काही तास व्यतीत करून अमित बागुल मित्रपरिवारातर्फे जवानांना तिरंगा ध्वज प्रदान करून त्यांच्या शौर्याला सलामी दिली.
खडकी येथील पॅराप्लेजिक रीहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जायबंदी जवानांसमवेत’ या उपक्रमांतर्गत शंभर तिरंगा राष्ट्रध्वज, बॅज हे पॅराप्लेजिक रीहॅबिलिटेशन सेंटरकडे सुपूर्द करण्यात आले.