‘मविआ’चे नेते बेळगावला जाण्यासाठी आक्रमक; कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा
बेळगाव | Maharashtra Karnataka Border Dispute – महाराष्ट्र- कर्नाटक वाद (Maharashtra Karnataka Border Dispute) चांगलाच पेटलेला आहे. आज (19 डिसेंबर) बेळगावात (Belgaum) होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला अचानक परवानगी नाकारण्यात आली आहे. बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, बेळगावला जाण्यासाठी महाराष्ट्रातील नेते आक्रमक झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी बेळगावच्या सीमेवर महाराष्ट्राच्या नेत्यांना अडवलं असून दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली आहे.
आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला असून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेळगावात जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे कोगनोळी टोलनाक्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
दरम्यान, खासदार आणि महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना देखील बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासंदर्भात बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी आदेश काढला.
One Comment