ताज्या बातम्यामनोरंजन

सलमानला ‘जान’ म्हणण्याचा अधिकार कोणाला? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा, म्हणाला, “तिला आय लव्ह यू म्हटल्यानंतर…”

मुंबई | Salman Khan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरनं सोशल मीडियावर धुमकूळ घातला आहे. तसंच सध्या सलमान खान या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमाननं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली होती. यावेळी त्याला जान म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे याबाबत खुलासा केला आहे.

कपिल शर्मानं सलमान खानला विचारलं की, सगळे तुला भाई बोलतात. पण तुला ‘जान’ म्हणण्याचा अधिकार तू कोणाला दिला आहेस? यावर सलमाननं अगदी मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला की, “तुम्ही आयुष्यात जान म्हणण्याचा आधिकार कोणालाही देऊ नका. जान जान म्हणत त्या तुमचा जीव घेतात. तुझ्यासोबत राहून मला खूप भारी वाटलं. मी ते शब्दातही व्यक्त करू शकत नाही. मग थोडा वेळ जातो आणि नंतर आय लव्ह यू म्हटलं जातं. आय लव्ह यू म्हटल्यानंतर तो मुलगा फसला आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा.”

पुढे तो म्हणतो, “जान हा शब्द अपूर्ण शब्द आहे. पूर्ण वाक्य कदाचित असं असेल की, मी तुझा जीव घेईन. त्यानंतर मी दुसऱ्याला जान बनवेन आणि त्याचाही जीव घेईन”, असं सलमान म्हणताच कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंगसह सर्व प्रेक्षक हसायला लागतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये