ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“2024 ला देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज देऊ…”, जयंत पाटलांचा खळबळजनक दावा

मुंबई | Jayant Patil – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) स्पष्टच शब्दात सांगितलं आहे. आत्ताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला आम्ही सरप्राइज देऊ, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. तर राष्ट्रवादीचा 2024 च्या निवडणुकीसाठी काय प्लॅन असेल, याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागलो असून 2024 ला महाविकास आघाडी सत्तेत येईल हेच देवेंद्र फडणवीसांना सरप्राइज असेल, असा विश्वास जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाच्या “माझा महाराष्ट्र माझा व्हिजन” या कार्यक्रमात बोलत होते.

राष्ट्रवादीचे मतदारसंघ भाजपनं टार्गेट केले आहेत, याला राष्ट्रवादी कसं सामोरं जाणार? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभेसाठी भाजपनं मतदारसंघ लक्ष्य केले आहेत. केंद्रीय मंत्री त्या मतदारसंघाचे दौरे करत आहेत, याचं मतदाराला काय देणं घेणं नाही. तसंच भाजपच्या मतदारसंघात मविआचाच आमदार असेल. 2019 ला जसं सरप्राइज मिळालं, तसंच पुन्हा 2024 मध्ये मिळेल, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, जे जे शिवसेनेला सोडून गेले आहेत त्यांचा आत्तापर्यंत पराभव झाला आहे. तसंच आता जे 40 आमदार सोडून गेले आहेत, त्यापैकी सहा सात कसेबसे निवडून येतील आणि उरलेले सर्व पराभूत होतील. शिवसैनिकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानभुती आहे. ठाण्यात मुख्यमंत्री महोदयांनी धनुष्यबाण करायला टाकलाय, असं ऐकलं. पण ते जरी सर्व काही घेऊन गेले तरी उद्धव ठाकरेंकडे ठाकरेपणा तसाच राहणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जिते उभे राहतील, तिथे शिवसेनेचा आमदार निवडून येईल. शिवसेनेचा आमदार असलेल्या ठिकाणी जाऊन कधीही आमचाच आमदार येईल, असं म्हटलं नाही. जिथे भाजपचा आमदार आहे तिथे राष्ट्रवादीचा किंवा मविआचा आमदार येईल, असं म्हणालो होतो, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये