ताज्या बातम्यापुणे

लोहगावच्या विकासकामांचा आराखडा भकास

आजी-माजी आमदारांची विकासाची स्वप्ने हवेतच : नागरिक अडचणीत

येरवडा : विधानसभा निवडणूक काळात आजी-माजी आमदारांनी लोहगावकरांना विकासकामांची दिलेली आश्वासने ही हवेतच विरली असून महापालिकेत समावेश होऊन गावकऱ्यांना विकासकामांबाबत प्रतीक्षाच करण्याची वेळ येत असल्याने पालिकेच्या वतीने गावासाठी बनविण्यात आलेला विकासकामांचा आराखडा भकास असल्याचे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

२००९ साली नव्याफेररचनेनुसार वागवा शेरी हा नव्याने विधानसभा मतदार संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळेस या मतदार संघात इतर उपनगरासह लोहगावचा देखील मतदार संघात समावेश करण्यात आला असला तरी पण हे गाव अद्याप ही विकासकामापासून वंचित राहिल्याने परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. कारण मतदारस संघावर प्रथम राष्ट्रवादीचे सध्या भाजपमध्ये असलेले बापूसाहेब पठारे यांच्या रूपाने झेंडा फडकविण्यास पठारे यांच्या रूपाने यश आले. तर २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत जगदिश मुळीक यांच्या रूपाने युवा चेहरा मतदार वर्गांना दिला तर २०१९मध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने सुनील टिंगरे यांच्या रूपाने असलेला बालेकिल्ला मिळविण्यास यश मिळविले असले तरी पण या भागाचा विकास करण्यास तीन ही आमदार असमर्थ ठरल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.

स्थानिक आमदार समस्या सोडविण्यात असमर्थ :
गेल्या तीन वर्षांपूर्वी या भागाचा जरी महापालिकेत समावेश करण्यात आला असला तरी पण परिसरातील एक लाखाहून नागरिकांना तर १५ ते १६ वाड्यावस्त्यावरील लोकांना विकासकामे वंचित राहण्याची वेळ येत असेल व स्थानिक आमदार देखील असलेली मुख्य समस्या सोडविण्यास असमर्थ ठरत असतील तर या गावचा विधानसभेपाठोपाठ महापालिकेत समावेश करून उपयोग काय?

त्यातच तीन वर्षांपूर्वी गावचा महापालिकेत समावेश करण्यात आल्याने गावाचा काही प्रमाणात विकास होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण त्यांनी बाळगलेल्या स्वप्नांचा पक्का चक्काचूर झाल्याने महापालिकेत समावेश होऊन या भागाचा उपयोग काय?असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. कारण दोन दिवसापूर्वी वडगाव शिंदे भागाकडे जाणारा मार्ग अरुंद असल्याने झालेल्या अपघातात रोशनी अंगरखे या शाळकरी विद्यार्थींस जीव गमावण्याची वेळ आली. तर वाघोली,धानोरी या वेगवेगळ्या झालेल्या मार्गावर ही अल्पवयीन मुलांना जीव गमाविण्याच्या घटना ताज्या असतानाच अशा घटनांना आळा बसविण्याऐवजी स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प मूग गिळून बसल्याचे चित्र मतदार संघात पाहायला मिळत आहे. तर ऐन पावसाळ्यादरम्यान खंडोबा माळ या भागाकडे जाणाऱ्या मार्गावरून जातांना वाहनचालकांना कसरत करूनच वाहन चालविण्याची वेळ येते. कारण खड्ड्यांनी साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे रोज छोट्या मोठ्या घटनेत वाढ होऊन अनेक वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना घडत आहे.

याबरोबरच लोहगाव-वाघोली रस्त्याची पण चाळण झाली असून कर्मभूमीनगर परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने या रस्त्याला नदीचे स्वरूप दरवर्षी प्राप्त होत असल्याने रस्त्यासाठी या भागातील नागरिकांना चक्क पाण्यात उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी खरोखरच जनतेचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणूक काळात विविध पक्षातील उमेदवार निवडणूक झाल्यांनतर विकासकामे करण्याचा दावा करत असले तरी पण हा दावा फोल ठरून दिलेली आश्वासने ही हवेत विरून त्यांचा फुसका बार झाला आहे. फुसका बार झाला आहे. त्यामुळे निवडणूक काळात मतासाठी झोळी घेऊन उभे राहिलेले हे लोकप्रतिनिधी यांना त्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये