‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरवर युट्यूबची कारवाई, अदा शर्मा संतापली; म्हणाली…

मुंबई | The Kerala Story – आज (5 मे) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेक इस्लामिक संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. अशातच आता या चित्रपटाच्या ट्रेलरवर युट्यूबनं कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वीच यूट्यूबनं या चित्रपटाच्या ट्रेलवर कारवाई केली होती. पण आता एका यूजरनं यूट्यूबवरून स्क्रीनशॉट घेत या कारवाईसंदर्भातलं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये, ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर सर्च केल्यानंतर यूट्यूबवर एक इशाराचिन्ह दिसत आहे. ज्यावर लिहिले आहे की हा कंटेंट आत्महत्येशी संबंधित आहे.
युट्यूबनं केलेल्या या कारवाईनंतर ‘दे केरळ स्टोरी’ चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) चांगलीच संतापली आहे. अदा शर्मानं यूजरनं केलेलं ट्विट रिट्विट केलं. तिनं ट्विट करत म्हटलं आहे की, “सत्यमेव जयते, विजय सत्याचाच होईल.”