क्राईमदेश - विदेशपुणे

जोडप्याला प्रेमविवाह पडला महागात; मुलीच्या घरच्यांनी उचलले टोकाचे पाऊल

पुणे | पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात प्रेमविवाहामुळे तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी अंबरनाथ मंदिर परिसरातील एका 52 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाने पुण्याच्या लोणीकाळभोर गावातील एका मुलीसोबत प्रेम विवाह केला. त्या गोष्टीचा राग मुलीच्या घरातील लोकांना आला. याकारणातून चौघांनी मिळून तक्रारदार यांच्या मुलाला स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या इतर साथीदारांना देखील मारहाण केली. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मारहाण करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील दोघांना अटकही करण्यात आली आहे.

हा प्रकार सुरू असताना तरुणाचे वडील भांडण सोडवण्यासाठी आले असता, त्यांना देखील धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली आहे. याबाबत तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रेमविवाह करणार्‍या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये