ऐन दिवाळीत ग्राहकांच्या खिशाला कात्री; एलपीजी सिलिंडर दरात वाढ

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) कमर्शियल सिलिंडरच्या दरामध्ये वाढ केली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी झेप घेतली आहे. (LPG Price Hike) दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी भारतीय तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मेट्रो सिटीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ६२ रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २००० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
दर १८०० रुपयांवर पोहोचला
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत: मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरांमध्ये मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. कोलकातामध्ये १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत २००० रुपयांपेक्षा फक्त ३५ रुपये कमी आहे. त्याच वेळी, 19 किलोचा एलपीजी सिलिंडर ज्याची किंमत दिल्ली आणि मुंबईमध्ये १७५० रुपयांपर्यंत होती ती आता १८०० रुपयांच्या पुढे गेली आहे. या नवीन किमती १ नोव्हेंबर २०१४ पासून लागू झाल्या आहेत.