ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

MP मध्ये धक्कातंत्र! मोहन यादव मुख्यमंत्री तर, दोन उपमुख्यमंत्री; तोमर यांनाही मोठी जबाबदारी

भोपाळ : (Madhya pradesh two duputy CM) मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स संपला आहे. आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. तर, राज्याला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आलं आहे.

58 वर्षीय मोहन यादव यांच्या हाती मध्य प्रदेश राज्याचे सूत्र देण्यात आले आहेत. पक्षाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. नरेंद्र सिंह तोमर यांनी आमदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभा स्पीकरची जबाबदारी देण्यात आली आहे.

अर्थ मंत्री आणि मंदासोर मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार जगदीश देवडा आणि जनसंपर्क मंत्री राजेंद्र शुक्ला या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर मोहन यादन म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबाबत धन्यवाद. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझी जबाबदारी योग्य रीत्या निभावण्याचा प्रयत्न करेन.

मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातले मानले जातात. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते. भाजप पक्षाच्या भोपाळमधील बैठकीमध्ये शिवराज सिंह चौहान यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. भाजपने मोहन यादव यांची नियुक्ती करुन धक्कातंत्राचा वापर केला असल्याचं बोललं जातं. कारण, मुख्यमंत्रीपदासाठी चौहान हे प्रबळ दावेदार होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये