ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्र

“…तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार”, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

नागपूर | Devendra Fadnavis : सरकारनं केलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीवरून (Onion Export Ban) राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तसंच विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. जर शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खेरदी करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

कांदा लिलावासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीचे धोरणा लागू केल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. 4 हजारांवर कांद्याचा दर गेला असताना सरकारनं निर्यातबंदी लागू केली होती. त्यामुळे अचानक कांद्याचे दर कोसळले. आता कांद्याचे दर दीड हजारांवर गेले आहेत. त्यामुळे यावर केंद्र सरकार कोणती भूमिका मांडणार असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला होता.

दानवेंच्या या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कांद्याच्या प्रश्नाबाबत मी पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला सांगितलं की, जेव्हा आपल्या देशात कांदा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी आपण निर्यातबंदीची परवानगी देतो. पण आता देशामध्ये 25 ते 30 टक्के कमी कांदा आहे. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावरून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर गरज पडली आणि शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये