आरोग्यताज्या बातम्याशेत -शिवार

मसूर डाळ खा.. आहेत अनेक फायदे, निरोगी हृदय आणि मन सक्रिय ठेवा

Masoor Dal Benefits : आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेल की, स्वयंपाकघर आरोग्यासाठी एक सर्वोत्तम स्त्रोत आहे. मसाल्यापासून कडधान्ये, भाज्यांपर्यंत शरीराला आवश्यक असणाऱ्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर असणारे अनेक घटत या स्वयंपाक घरातून मिळतात. आजकाल सात्विक आणि रसायन विरहीत खाण्यावर लोकांचा जोर दिसतो. आहाराबद्दल जागरुकता वाढली आहे. कडधान्ये हा एक असा घटक आहे, ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

मसूरडाळ आपल्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण पूर्ण करण्यास मदत करते. मसूरडाळ आरोग्यदायी आणि स्वादिष्ट कडधान्यांपैकी एक असून आहारात तिचा समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. भारतीय स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी डाळ म्हणून मसूरकडे पाहिले जाते. या डाळीचा रंग लाल, नारिंगी, तपकिरी आणि काळा असू शकतो. शिजल्यानंतर मसूर डाळ मऊ सोनेरी रंगाची होते आणि तिला छान चव येते. मसूरडाळीमध्ये 26 टक्के प्रथिने असतात. मसूर डाळ खाण्याचे काय फायदे आहेत आणि तुम्ही ती कशी खाऊ शकता ते जाणून घेऊया..

मसूरडाळ ही लोह, प्रथिने, फायबर आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे. ज्यांना निरोगी मार्गाने वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

जीवनसत्त्वे स्त्रोत :
या डाळीत पोटॅशियमचा चांगला स्रोत असतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडते. याशिवाय व्हिटॅमिन C, B6, B2, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियमही मसूरडाळीमध्ये असतात.

कॅलरीज कमी होतात
ज्यांना कॅलरीज नियंत्रणात ठेवायची आहेत त्यांच्यासाठी लाल मसूरडाळ खाणे योग्य आहे. एका भांड्यात शिजवलेल्या मसूरमध्ये फक्त 168 कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही तिचा सहजरित्या आहारात समावेश करू शकता.

हृदयाचे आरोग्य वाढवण्यास मदत : फायबर, मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर असल्याने मसूरडाळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण यातील मॅग्नेशियमचे प्रमाण शरीरातील रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. फोलेट धमन्यांचे नुकसान टाळण्यास मदत करते. यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. लाल मसूरमधील फायबर घटक शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी निरोगी ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी मदत होते : मसूरडाळीचे सेवन केल्याने वजन प्रभावीपणे नियंत्रित करता येते. यात असणारे फायबर आणि प्रथिने वजन कमी करण्यासाठी चांगली असतात. तसेच कॅलरी कमी असल्याने या दोन पोषक तत्वांमुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुम्ही अस्वस्थ खाणे टाळता.
वृद्धत्व थांबवण्यासाठी मदत होते : लाल मसूर हे सर्वोत्तम अँटी-एजिंग फूडपैकी एक मानले जाते. मसूर फायबर, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे याला पोषणाची पॉवर हाऊस असंही म्हटंल जातं. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास, मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि वृद्धत्व रोखण्यास मदत करते.
हाडे आणि दात निरोगी राहतात : मसूरमध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. कॅल्शियमसोबत आपली हाडे तयार करण्यास मदत करते. हाडांची रचना राखण्यासोबत दात निरोगी ठेवण्यास मसूर डाळ मदत करते. मसूर डाळ आणि पनीर सूप हे एक स्वादिष्ट प्रथिन स्त्रोत आहे. तुम्ही कधीही गरमागरम करुन ते खाऊ शकता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये